सरकारचे दुर्लक्ष, पण माणुसकीची साथ!’ स्वतंत्र मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मुक्ताईनगर शाखेकडून सीएसआर ऍक्टिव्हिटी अंतर्गत एक लाख वीस हजार रुपयाचे वॉटर प्युरिफायर भेट ! कंपनीचे परिसरातून कौतुक

एका बाजूला पटसंख्येचे कारण पुढे करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत… सरकारी यंत्रणांच्या उदासिनतेमुळे गरिबांच्या लेकरांची शाळा धोक्यात आली आहे! पण म्हणतात ना, ‘जिथे ओढ असते, तिथे मार्ग निघतोच.’
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी पाहिल्यावर आणि ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल की, जर समाजाची साथ मिळाली, तर आपल्या जिल्हा परिषद शाळा नक्कीच कात टाकतील!
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला स्वतंत्र मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले यावेळी गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व कंपनीची टिम उपस्थितीत होते यावेळी लोकनियुक्त सरपंच मंदाताई कोळी व रिजनल मॅनेजर देवेंद्र रौराळे यांच्या हस्ते रिबीन कापुन उद्घाटन करण्यात आले यामुळेच आता बेलसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे हे शक्य झालंय ते स्वतंत्र मायक्रोफानॅन्स प्रायव्हेट लिमिटेड मुक्ताईनगर शाखेच्या पुढाकारामुळे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR activity अंतर्गत वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले आहे यामध्ये छत्रपती संभाजी नगर चे रेजिनल मॅनेजर – श्री देवेंद्र रौराळे .,बुलढाणा युनिट चे युनिट मॅनेजर- श्री गणेश खरसणे ,मुक्ताईनगर शाखेचे व्यवस्थापक- श्री योगराज माळी ,मुक्ताईनगर शाखेचे सहायक व्यवस्थापक- श्री राहुल बोडखे मुक्ताईनगर शाखेचे – फील्ड ऑफिसर – श्री वैभव राखोंडे ,मुक्ताईनगर शाखेचे ऑडिट मॅनेजर- श्री आदित्य सर यांच्या सहकार्याने ते शक्य झाले आहे
जिथे शाळा बंद पाडण्याचे प्रयत्न होत आहेत, तिथे खासगी कंपन्या मदतीला धावून येत आहेत. असेच एक उदाहरण मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे पहावयास मिळाले आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत स्वतंत्र मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कडून जिल्हा परिषद शाळेला वाटर प्युरिफायर भेट देण्यात आले आहे यामुळे स्वतंत्र मायक्रो फायनान्स चे परिसरातून व जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.तर विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून आता सुटका मिळणार.
बेलसवाडीच्या या शाळेला मिळालेली ही भेट केवळ एक ‘वस्तू’ नाही, तर तो ग्रामीण शिक्षणाप्रती असलेला एक ‘विश्वास’ आहे. जर प्रत्येक कंपनीने आणि दानशूर व्यक्तीने अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळांना बळ दिलं, तर ‘शाळा बंद’ करण्याचं धाडस कुणीही करणार नाही.
स्वतंत्र मायक्रोफिनॅन्सच्या या कार्याचं सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
कॅमेरामन [सचिन झनके] सह, विठ्ठल धनगर तापी पूर्णा न्यूज, मुक्ताईनगर.



