शेगाव- तालुक्यातील भोनगाव परिसरात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव तालुक्यातील भोनगांव परिसरामध्ये १८ जुलै पासून ते १९ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी “साचले आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो हेक्टर जमीन हि पाण्याखाली गेली असून शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे कृषी विभागाने सर्व्हे करून पंचनामे करण्यात यावे अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.याबाबत वृत्त असे की यावर्षी एक महिना पाऊस उशिरा पडल्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वीच भोनगाव कालखेड पहूर पूर्ण बोडगाव सगोडा या परिसरातील आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, कपाशी ची पेरणी केली होती. परंतु १८ जुलै पासून ते १९ जुलै दुपारपर्यंत सतत जोरदार पाऊस पडल्यामुळे परिसरातील नदी नाल्याला पूर आल्यामुळे नदीकाठच्या व नाल्या काठच्या तसेच रोडच्या बाजूला असलेल्या शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतातीलपिके ही पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे



