वंचित चा इशारा मोर्चा………

… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील गायरान जमीनी, झोपडपट्टी पूनर्विकास योजना, बीडीडी चाळीचा पूनर्विकास आदी विषयांवर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पालिका मुख्यालयासमोर अडविण्यात आला. यावेळी झालेल्या जाहिर विराट सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. मुंबई, नवीमुंबईसह राज्याच्या विविध भागातून या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक आले होते. “गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, “गायरान जमीनी हक्क मिळालाच पाहिजे”, अशा घोषणा देत पालिका मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. गेल्या महिनाभर या मोर्चाची तयारी सुरू होती. मोर्चा विराट निघाला. यावेळी विभागवार पक्षाच्या पदाधिका-याची भाषणे झाली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्याची यशस्वी चर्चा झाली, अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.



