बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

भोनगाव फाटा येथे पाणीटंचाईवरून नंदाताई पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव । १४० गाव पाणी पुरवठा योजनेतील वाढीव ३८ गाव पाणी योजनेंतर्गत जानोरी माटरगाव जि.पा. सर्कलमधील गावांना पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता राष्ट्रीवादी महिला काँग्रेस (शरद पवार गट) कडून सौ. नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात आज सकाळी भोनगाव फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

पाणी योजना

या आंदोलनाबाबत सौ. नंदाताई पाऊलझगडे यांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, जळगाव जामोद मतदारसंघाकरिता १४० गाव पाणीपुरवठा योजना अंतर्गत ३८ नवीन वाढीव गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता योजना राबविण्यात आली आहे. २०१९ पासून या योजनेचे काम सुरू असून वारंवार आंदोलने करून सुध्दा अजूनपर्यंत ही योजना पुर्णत्वास गेलेली नाही. त्यामूळे या ३८ गावातील नागरिकांची अवस्था ‘पाणीपुरवठा योजना राबविली पण तहान नाही भागविली’ अशी झाली आहे.

सदर योजनेच्या पुर्णत्वाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. करिता प्रशासनाला जाब विचारण्याकरिता जानोरी माटरगाव जि.प. सर्कलमधील गावातील नागरिकांकडून आज मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी भोनगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात महिलांचा सहभाग होता

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button