सदगुरू गुळपट्टीचे सुरेश टोहरे यांनी दिल्लीत वाढवला अकोला जिल्ह्याचा मान.

वार्ताहर.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय, आयुष मंत्रालय भारत सरकार आणि एकात्मिक आयुष परिषदेच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत भारत मंडपममध्ये आरोग्य उत्सव आणि महोत्सव-२०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात देशभरातील अनेक आयुष संस्थांनी सहभाग घेतला, विदर्भ व विशेषत: अकोला जिल्ह्यासाठी ही विशेष अभिमानाची बाब होती की अकोल्याच्या सदगुरू गुळपट्टीचे संचालक सुरेश टोहरे यांनी एम. एस. एम. ई. मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनीत अकोल्याच्या सुप्रसिद्ध सद्गुरू गुळपट्टीचा स्टॉल लावला . उल्लेखनीय हे की हा अकोला जिल्ह्यातून एकमेव स्टॉल होता. भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आयोजित या महोत्सवात उत्तरप्रदेश येथील खासदारांसोबत अनेक मान्यवरांनी भेटी देऊन अकोला जिल्ह्यातील सद्गुरू गुळपट्टीची चव चाखली व मुक्तकंठाने गुळपट्टीची प्रशंसा करत ही गुळपट्टी बनवण्याच्या पद्धतीची माहिती जाणून घेतली.
समारोप सत्रात पतंजलीचे आचार्य बालकृष्ण आणि त्रिपुराच्या माननीय राज्यपालांच्या पत्नी रेणुका नल्लू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.यावेळी सद्गुरू गुळपट्टीचे संचालक सुरेश टोहरे यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.



