महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरामध्ये दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू ..

तेल्हारा शहरामध्ये दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू ..

तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान ,भैरवगड स्थित हनुमान सागर हा वान नदीवर बांधण्यात आलेला धरण असून या धरणातील पिण्याच्या पाण्यासाठी वाढत्या आरक्षणामुळे समस्या निर्माण होत आहे शेतकर्यानां सिंचना करीता लागणारे पाणी मिळत नसल्यामुळे,व बाळापुर येथे जात असलेल्या पाईप लाईनला तात्काळ स्थगिती मिळणे ,ह्या दोन प्रमुख मागणी करीता रा. आवार ता. संग्रामपुर जि बुलढाणा येथील आशीष प्रमोद  अवचार व दिपक शंकरराव ईंगळे या दोन शेतकऱ्यांनी तेल्हारा शहरामध्ये तहसील कार्यालया जवळ आमरण उपोषण सुरु केले आहे.

वान धरणावरील लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला, तहसिलदार तेल्हारा, ठाणेदार तेल्हारा, यांना 2 फेब्रुवारीला मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाला बसू असा ईशारा निवेदनातून देण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही, म्हणून या विषयाला वाचा फोडण्यासाठी या उपोषणाला सुरुवात करावी लागली असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, या उपोषणाला संग्रामपुर,व तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा तसेच विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. उपोषण कर्त्यांची काल दि. 15/02/23 ला वैद्यांनी उपोषण स्थळी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

वारी भैरवगड येथील हनुमान सागर, वान प्रकल्पाला संग्रामपुर तसेच तेल्हारर्यातील शेतकऱ्यांनी  बहुमोल असे त्याग व समर्पण केलेले आहे ,या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने 1980 ला सुरूवात झाली होती,काही कारणास्तव या प्रकल्पाला विलंब झाला होता, तेव्हा  तात्कालीन नेतृत्वाने  हि समस्या सक्षमपणे शासन दरबारी बाजू मांडून नंतर हा प्रकल्प सन 1989 पासुन ते 2004 पर्यंत पूर्णत्वास नेऊन स्थानिक शेतकर्‍यांच्या हितास्तव 2004 मध्ये लोकार्पित केलेला आहे.

     उपोषण कर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढून टॉवर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हारार्पन केले नंतर  तहसील जवळ उपोषण स्थळी जाऊन मंडपामध्ये  शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेला  पुष्प हार घालून वंदन केले साधारण तीन वाजता च्या सुमारास उपोषणाला सुरुवात केली.

विजय घोडे
तालूका प्रतिनिधी तेल्हारा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button