हेल्मेट वापरा मृत्यूला ताळा

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला प्रतिनिधी : दत्ता सुलताने*
*सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना आजूबाजूला आपण पाहतो. त्यातून बोध घेऊन आपण आपलीं वाट चालायची असतें; परंतु आपल्या बाबतीत असे काही घडू शकत नाही. असा फाजील आत्मविश्वास अनेकांना असतो त्यामुळे बेफिकीर वृत्तीने दुर्लक्ष करण्याची मानसिकताही असते.ही मानसिकता बदलायला हवी.विशेषत : हेल्मेट वापराबाबत आता स्वतःच पुढाकार घ्यायला हवा कोणत्याही गोष्टीची सक्ती केली की या विरुद्ध बंड करण्याची माणसाची प्रवृत्ती असते; पण कोणत्याही गोष्ट मनापासून करण्याची ठरली तर त्यात यश मिळते. आपण एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःला हेल्मेट घालण्याची सक्ती करायला हवी रस्त्यावरील वाहने वाढत आहेत रस्त्याची स्थिती वाहनाची गर्दी वेग आणि इतर अनेक कारणामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतेच आहे रस्त्यावरील बळीची संख्या वाढते आहे. अशा वेळेस सुरक्षितेच्या उपायाची अंमलबजावणी प्रत्येकानी करण्याची गरज आहे. मी हळू आली व्यवस्थित वाहन चालवतो असे म्हणून चालत नाही. समोरून येणारे वाहन कसे येते, ते सांगता येत नाही. त्यामुळेच सुरक्षितेची गरज जास्त असते. सुरक्षेच्या उपायांचा एक भाग हेल्मेट आहे. जीव घेणाऱ्या अपघाताच्या वेळी हेल्मेट आपलं डोकं शाबूत ठेवते, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरते तर हेल्मेट अशा प्रसंगात जीवदानच देते. अवतीभवती घडणाऱ्या घटनेतून एवढे तर शिकले पाहिजे. जोपर्यंत आपणावर वेळ येत नाही. तोपर्यंत आपण स्वतःला सुरक्षितच समजलं असतो: पण हा गैरसमज वेळ आल्यावरच दूर होतो. प्रत्येकाने किमान स्वतःच्या सुरक्षेततेसाठी स्वतः निर्णय घेण्याची आवश्यकता आहे…..



