बुलढाणा

नवरात्रोत्सव उत्साहात साजरा*

*नवरात्रोत्सव उत्साहात साजरा*

: *लेट बी. एस. देशमुख स्कूल मध्ये गरबा नृत्यात विद्यार्थी व पालकांचाही सहभाग.*(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) शेगांव स्थित लेट बी एस देशमुख स्कूल मध्ये नवरात्रोत्सव उत्साह निमित्त गरबा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेत शिक्षण घेत असलेल्या असलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना निमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी पालकांनी विशेष करून महिलांनी चांगला प्रतिसाद देत या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी गरबा आणि दांडिया मध्ये सहभागी होत मोठ्या आनंदाने व उत्साहाने एकच जल्लोष करत नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला. गरबा आणि दांडिया सुरू करण्यापूर्वी स्कूल मधील माता पालक संघा कडून देवीची आरती करण्यात आली व आरती मध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर लगेचच गरबा कार्यक्रम सुरू केला. विद्यार्थी व पालक यांचा गरबा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना केवळ शालेय पुस्तकाचे ज्ञान न देता संस्कार वा संस्कृतीचे जतन सुद्धा करावे ह्याच हेतू मार्फत लेट बी एस देशमुख स्कूल ने गरबा च्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button