महाराष्ट्रविदर्भ

मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट इंस्टाग्राम वर टाकल्याने अज्ञात इसमाविरुद्ध काय कार्यवाही आहे.

 मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट इंस्टाग्राम वर टाकल्याने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल . खोटी आय डी तयार करून आक्षेपार्ह फोटो व मजकुर केला अपलोड ठाणेदार आव्हाळे यांच्या आश्वासनाने संतप्त मुस्लीम समाज बांधवांनी दाखला संयमवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडवाशिम /मालेगाव     जातीय तेढ निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावतील अशा  प्रकारचे फोटो व मजकूर सोशियल मीडियावर प्रसारित करणाऱ्या अज्ञात इसमा विरुद्ध मालेगाव पोलिसांनी २ मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजताचे सुमारास सदर गुन्हा दाखल केला आहे .     मोहम्मद मुस्सवीर शेख मुजीब वय २३ वर्ष राहणार गांधीनगर मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट वर खोटी आयडी तयार करून जातीय तेढ निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे अल्लाचे फोटो व अल्ला बाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केला . त्यामुळे मुस्लीम बांधवांमधे तिव्र संताप व्यक्त केला जात आहे . ज्या अज्ञात इसमाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ॲप करून प्रसारित केल्या . त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते पुढील कार्यवाही करीता सदर फिर्यादी सोबत जोडून पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत . . सदर प्रकरणी अज्ञात ईसमाविरुद्ध कलम १५३ अ , २९५ अ भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे हे करीत आहेत .    या घटनेमुळे मुस्लीम समाजात संतापाची लाट उसळली असून त्वरित सदर आरोपी नराधमाचा शोध घेऊन त्याचेवर कडक कारवाई करण्याची मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे . या मागणी साठी २ मार्च चे रात्री ११ वाजताचे सुमारास शहरातील शेकडो मुस्लीम बांधव पोलीस स्टेशनमधे जमा झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button