Uncategorized

लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणाईने १००% मतदान केलेच पाहिजे – गायकवाड मायनॉरिटी मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अजय गायकवाड

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – आज होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकां करिता आपला अमूल्य मताधिकार तरुण पिढीने १००% बजावून लोकशाही बळकट करण्यात आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन
गायकवाड मायनॉरिटी मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अजय गायकवाड यांनी वाशिम जिल्ह्यातील समस्त तरुणाईला केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्ये तरुणांची मतदानाची टक्केवारी ही कमी असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या आकडेवारी वरून बघायला मिळते. या मागचे प्रमुख कारण म्हणजे तरुणवर्गाची मतदान हक्क बजाविन्या बाबतची उदासीनता अथवा कंटाळा असे आहे.
आजकालच्या तरुणवर्गामध्ये माझ्या एकट्याच्या मतदानामुळे काय फरक पडेल, मतदानाची सुट्टी कुठे फिरण्यासाठी वापरूया अशी मानसिकता सरास आढळून येते परंतु थेंबे-थेंबे तळे साचे व मतदानाची सुट्टी ही फिरण्याचासाठी नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी साठी आहे हे भान तरुणांना असायला पाहिजे.
मात्र तो अधिकार वापरताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता, उमेदवाराची जात-धर्म-पंथ याचा विचार न करता ज्या उमेदवाराला तरुणवर्गाच्या समस्या जसेकी शिक्षण, रोजगार, इत्यादी ची जान असेल अश्याच उमेदवाराला मतदान करावे व लोकशाहीच्या ह्या उत्सवात सहभागी होऊन तरुणांना १०० % मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन गायकवाड मायनॉरिटी मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अजय चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button