बुलढाणामहाराष्ट्र

शेगाव मधिल दोन डॉक्टरांनवर गुन्हा दाखल,,___स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे


सविस्तर वृत्त असे आहे कि ‌
गर्भवती महिलेवर चुकीचा उपचार केल्या प्रकरणी डॉक्टर प्रविण नागरगोजे शेगाव व खामगांव येथील‌ डॉक्टर गणेश महाले यांच्या विरूद्ध शेगाव‌ शहर पोलीस स्टेशन मध्ये दि 23 मे रोजी विविध कलमांनव्दारे न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला
शितल‌ निलेश ढोले वय (25) यांच्या वतीने शेगाव मधील राज राजेश्वर कॉलनीतील रहीवाशी एड निलेश रामेश्वर ढोले यांनी न्यायालयात तक्रार दाखल‌ केली शितल ढोले गर्भवती असतांना तीने शेगाव‌ मधील जगदंबा चौकातील डॉक्टर प्रविण नागरगोजे वय (42)यांच्याकडे उपचार घेतला त्याच्या सल्लेनुसार पुढील‌ उपचार खामगांव थेथील डॉक्टर गणेश महाले यांच्याकडे केला 29 जुलै 2022 रोजी डॉक्टर प्रविण नागरगोजे यांच्या रुग्गालयात मुलीला जन्म दिला त्यानंतर त्या मुलीला अकोला व मुंबई येथील बालरोगतज्ञ्ज्ञांकडे उपचार केला असता तेथील डॉक्टरांनी गर्भावती वर चुकीचा उपचार घेतल्या बाबतची माहीती दिली
डॉक्टर प्रविण नांगरगोजे व डॉक्टर गणेश महाले यांनी महीला गर्भवती असतांना चुकीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेला 7ते8 लाख रुपए खर्च सोसावा लागला भविष्यातसुध्दा खुप मोठा खर्च लागणार आहे शितल ढोले यांनी साक्षीदार डॉक्टर अतुल राजपुत यांच्याकडे उपचार केला असता डॉक्टर प्रविण नागरगोजे व गणेश महाले या दोघांनी त्याच्या उपचाराशी गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले एड निलेश ढोले यांच्याव्दारे विद्यमान न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारी‌वरून मंगळवारी न्यायालयाच्या आदेशावरून दोन्ही डॉक्टरांन विरूद्ध कलम 156(3)CRPC नुसार शेगाव पोलीस ठाण्यात कलम 269 270 420 36 भांदविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button