
फुंडकर////////////////////////स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे//////////////////“शासन आपल्या दारी” उपक्रमाला खामगांवात उत्स्फुर्त प्रतिसादखामगांव – समाजातील अंतिम घटकातील नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना न्याय मिळावा हाच हेतू राज्य़ातील भाजपा शिवसेना सरकारचा आहे, असे प्रतिपादन आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी केले आहे. खामगांव येथील श्रीहरी लॉन्स़च्या भव्य़ सभागृहात “शासन आपल्या दारी” योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी हा कार्यक्रम दि.25 मे 2023 रोजी पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात आ. ॲड.आकाश फुंडकर बोलत होते. यावेळी मंचावर आ.ॲड.आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे,गट विकास अधिकारी राजपूत न.प.मुख्याधिकारी सौ जयश्री काटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातील मान्यवरांचे शुभहस्ते दिप प्रज्व़लन करण्यात आले. या शिबिरात शासनाच्या विविध योजना राबविणारे उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी सौ देसले मॅडम, सी.डी.पी.ओ. वाघ, तालुका अधिकारी खंडारे, गट शिक्षणाधिकारी खरात, दुय्य्म निबंधक पवार, जि.प.उपअभियंता गुडदे, पशु वैद्यकीय अधिकारी अवताळे, उपमुख्यधिकारी सुर्यवंशी, नायब तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार हेमंत पाटील, नायब तहसिलदार पवन पाटील, नायब तहसिलदार गजानन बोरले, भगत पुरवठा निरीक्षक यांचे सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी विभाग निहाय लावण्यात आलेल्या कक्षांवर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की,”राज्य़ सरकारने मागील काही महिन्यात बिघडलेली घडी सुरळीत करण्यास सुरुवात केली असून प्रत्येक तळागाळातील घटकापर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” हे विशेष अभियान सुरु करुन शासनाच्या सर्व योजनांचा अंतीम घटकातील लोकांना लाभ देण्याचा प्रयत्ऩ आहे. आजच्या या कार्यक्रम स्थळी जवळपास सर्वच विभागाच्या विविध योजनांच्या लाभ धारकांना लाभ देण्यात येणार आहे. राज्य़ सरकार हे सर्व सामान्य़ जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असून शासन जनसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्ऩरत आहे.यावेळी वेळी उपस्थित नागरीकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल त्यासाठी आवश्य़क सर्व माहिती विभाग निहाय पुरवण्यात आली.



