चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असतांना स्फोट ; आग लागून चार भावंडांचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी प्रमोद सौंदडे
बऱ्याचदा मुलं मोबाईल हाताळतांना मोबाईल चार्जिंग संपून सुद्धा मोबाईल सोडत नाहीत… मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईल हाताळतात असं पाहायला मिळतं परंतु असंच मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईलवर गेम खेळणे महागात पडले असून मोबाईलच्या स्फोटाने चार भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना होळीच्या पूर्वसंध्येला मेरठा घडली आहे. सविस्तर माहिती अशी की,चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला अन् घराला आग लागून चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरठच्या जनता कॉलनी परिसरात घडली. या घटनेत आई-वडील गंभीर जखमी झाले. होळीच्या पूर्वसंध्येला हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
बऱ्याचदा मुलं मोबाईल हाताळतांना मोबाईल चार्जिंग संपून सुद्धा मोबाईल सोडत नाहीत… मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईल हाताळतात असं पाहायला मिळतं परंतु असंच मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईलवर गेम खेळणे महागात पडले असून मोबाईलच्या स्फोटाने चार भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना होळीच्या पूर्वसंध्येला मेरठा घडली आहे. सविस्तर माहिती अशी की,चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला अन् घराला आग लागून चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरठच्या जनता कॉलनी परिसरात घडली. या घटनेत आई-वडील गंभीर जखमी झाले. होळीच्या पूर्वसंध्येला हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. चार्जिंग लावलेल्या मोबाईलवर मुलं गेम खेळत होती त्याचवेळी एकाएकी मोबाइल व चार्जरच्या जोडणीत शॉर्ट सर्किट होऊन त्याचा स्फोट झाला. त्याच्या ठिणग्या पडल्याने गादीने पेट घेतला. त्यात जॉनी, त्यांची पत्नी बबिता व चार मुले सारिका (१०), निहारिका (८), संस्कार ऊर्फ गोलू (६) आणि कल्लू (४) गंभीररीत्या भाजले. उपचारादरम्यान रात्री निहारिका व गोलू यांचा, तर, रविवारी सकाळी सारिका आणि कालू यांचा मृत्यू झाला. जॉनीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तथापि, बबिता या गंभीर असल्याने त्यांना दिल्लीला हलविण्यात आले.



