संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची माळेगाव बाजार येथे जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता. प्रतीनिधी
माळेगाव बाजार : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या शिकवणुकीला स्मरण करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करूया.त्यांच्या भक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व अभिवादन केले. युवा शिवसेना शाखाप्रमुख रणवीर काकडे, डॉक्टर योगेश तायडे, ज्ञानेश्वर आखरे, गणेश डामरे, अनिल कोकाटे, गोपाल डामरे, अंकित तायडे, महादेव तुंबळे, संतोष काकडे, प्रमोद वानरे, गजानन काकडे, महादेव काकडे, तसेंच यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.



