सासरमंडळीकडुन विवाहितेचा छळ दहा लाख रुपयाची मागणी :- गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । माहेरहून १० लक्ष रूपये घेऊन आलीस तरच तुला नांदवू असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिल्याच्या विवाहितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेने शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार विवाहितेचे ४ मे २०१७ रोजी जनुना ता. मोताळा येथे तेथील सुनील मानकर यांच्यासोबत लग्न झाले. परंतु त्यानंतर सासरची मंडळी एकच तगादा धरून आहे की, तु माहेरहून १० लक्ष रूपये घेऊन ये नाहीतर तरच तुला नांदवू,
तसेच तेव्हापासून शिवीगाळ व मारहाण केल्या जात होती. त्यानंतर आता 3 जानेवारी २०२४ रोजी विवाहितेला घरून हाकलून दिले. तक्रारीत विवाहितेने पती अशोक सूनील मानकर, चुलत सासरे मनोहर अरविंद मानकर, सासू पुष्पा सुनील मानकर, छाया अरविंद मानकर, नणंद तिम्बू मनोहर मानकर, चुलत दिर मंगेश अनिल मानकर यांना आरोपी केले असून तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ सहकलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास नापोकॉ ज्ञानदेव डाबेराव हे करित आहेत



