शेगाव संत नगरीत घाणीचे साम्राज्य
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव :- माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन संत नगरी शेगाव येथे स्वच्छ शेगाव सुंदर शेगाव ही भूमिका बजावत सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे. परंतु शेगाव नगरातून मुरारका कॉलेज समोर रस्त्याने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला चंद्रलोक सोसायटी नगर या भागामध्ये गेल्या किती दिवसांपासून घाणीचे साम्राज्य आहे . तसेच बाहेर लहान मुलांना खेळणे सुद्धा अवघड झाले आहे.
आणि जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ अशा संत नगरीत
चंद्रलोक सोसायटी कॉलनी येथे मात्र
नगर परिषदेकडून अशी आशा करत आहेत की
या घाणीच्या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळावी व आम्हाला आरोग्यपूर्ण व सुखाचे जीवन जगता यावे आणि आमच्या लहान मुलांना आमच्या कॉलनीमध्ये स्वच्छंदपणे खेळता यावे एवढी रास्ता पेक्षा घरून आम्ही आपणास विनंती करतो की आम्हाला घाणीपासून होणान्या त्रासापासून सुटका मिळावी.



