महाराष्ट्रराजकीय

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! मा.राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचे तेल्हारा शहरात जल्लोषात स्वागत.

*खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!* *मा.राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचे तेल्हारा शहरात जल्लोषात स्वागत.* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी तेल्हारा दि.१०: *विजय शिवसेनेचा* *विजय हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा* *विजय धर्मविरांच्या त्यागाचा* *विजय लोकशाहीचा* *विजय कट्टर शिवसैनिकांचा* आधी स्वरूपाच्या घोषणा देत बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी तेल्हारा शहरामध्ये शिवसेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खरी शिवसेना कुणाची आणि आमदार अपात्र प्रकरणी दाखल याचिकांवर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय दिला. यावेळी विरोधकांच्या सर्व याचिका त्यांनी फेटाळून लावीत खरी शिवसेना शिंदे गटाचीच असल्याबाबतचा निवाडा दिला. या निर्णयाचे शिवसेना, तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडून तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांच्या सह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आनंदोत्सव साजरा केला .यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button