खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यामार्फत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप शिबिर संपन्न…

माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले असता, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप केले.

मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर” चे आयोजन करण्यात आले होते, आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज संबंधित “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण सर, जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी, नजमा तडवी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, विनायक पाटील, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, माजी प.स.सदस्य राजेंद्र सवळे, ललित महाजन, सचिन पाटील, गुणवंत पिवटे, अंकुश चौधरी, विक्रम वरकड, भाजयुमो तालुकाध्यक्ष विशाल झालटे, संतोष झनके, निखिल भोलाणकर, रवी राजपूत, विक्रम पाटील, राजेंद्र डापसे, मयूर महाजन, उमेश पाटील, पवन पाटील, सार्थक पाटील, सोमनाथ पाटील व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button