शैक्षणिकसामाजिक

डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल, सावदाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूल सावदा या शाळेत २७ व २८ डिसेंबर २०२३ असे दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार दि.२७ रोजी कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर त्यांना शिरटोपी घालून बंगाली गीतावर नृत्य करण्यार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना आदराने व्यासपीठावरपर्यंत पोहोचविले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी शाळेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हाँस्पिटलचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, एम.आय.डी.सी.सावदा येथील चेअरमन मनोज पाटील, लोकमत समुहाचे गौरव रस्तोगी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली.
कार्यक्रमामध्ये पुर्व प्राथमिक वर्गापासून ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमासाठी सावदा व फैजपूर परिसरातील मान्यवर व्यक्ती, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सचिन भिडे व त्यांचे सहकारी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थींनी व शिक्षिका अर्चना इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button