महाराष्ट्रमुबई

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा शहापूर च्या सभासदांचीशिवनेरी दूर्ग भ्रमंती व ओझर भेट

शहापुर – ( सचिन शेलवले ) सोमवार दिनांक 25/12/23 रोजी
शिवनेरी दुर्ग भ्रमंती….
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचेविषयी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. किंबहुना महाराजांच्या नावाचा जयघोष सुरू झाला तरी अंगात स्फुरण चढते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जाऊन राजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवगर्भ संस्कार असलेल्या माऊली गडाच्या भूमित घडलेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका शहापूरच्या वतीने शिवनेरी दुर्ग भ्रमंती मोहीम दि.२५डिसेंबर, २०२३रोजी आयोजित करण्यात आली होती.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका शहापूरच्या वतीने संत-महापुरुषांच्या विचारांतून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दुर्ग भ्रमंती मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत ८० हून अधिक लहान मोठ्या शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता. राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, राजश्री शाहूमहाराज यांसह थोर समाजसुधारक व महापुरुषांच्या जयजयकाराने शिवनेरीचा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी तरुण शाहीर शिवश्री. योगेश पाटील यांनी शिवमहिमा गीते सादर करून उपस्थित शिवप्रेमींच्या मनात स्फूर्ती जागवली तसेच शिवश्री. राहुल पाटील यांनी शिव गारद (शिव गर्जना) सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई,शाखा तालुका शहापूरच्या वतीने उपाध्यक्ष शिवश्री उमेश पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याबद्दलची सुंदर माहिती दिली. मोहिमेत सहभागी सर्वांनी शिवनेरी किल्ल्यातील विविध ठिकाणांची पाहणी करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला.
महाराष्ट्राच्या कणाकणात आणि मनामनात बसलेल्या छत्रपती शिवरायांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी शाखेच्या वतीने यापुढे देखील दुर्ग भ्रमंती मोहिमा आखल्या जातील, त्यात सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे शाखेचे अध्यक्ष शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांनी आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button