अहमदनगरखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

भुसावळ प्रतिनिधी दि 19
येथील भारतीय जनता पार्टी तर्फे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय घोष करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय..! जय भवानी जय शिवाजी..! घोषणा दिल्या.

जयंती निमित्त पुतळ्याचा संपुर्ण परिसर हा सुशोभित करण्यात आला असुन रात्री पासुनच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करण्यासाठी शिवभक्तांची मोठ्या संख्येने गर्दी दिसुन येत होती.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, पिंटू कोठारी,परिक्षित बऱ्हाटे, मनोज बियाणी, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, बापु महाजन, बोधराज चौधरी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे,आशिष पटेल, सुजित भोळे, अल्बर्ट तायडे, विलास सातदिवे, कैलास पाटील,सरचिटणीस अमोल महाजन, सागर चौधरी, जयंत माहुरकर,महिला आघाडीच्या अनिता आंबेकर, वैशाली सेतवाल, शोभा इंगळे, राजू खरारे,शंकर शेळके, प्रा प्रशांत नरवाडे, रवी ढगे, चेतन बोरोले,अमोल पाटील, अनुसुचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष ठोकळ, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष रिषभ राजपूत, वसंत पाटील, प्रमोद पाटील, अभिजीत मराठे, शैलेंद्र ठाकरे, किरण पाटील, उदय पाटील, प्रा प्रशांत पाटील, रुपेश देशमुख, कैलास शेलोडे, गौरव आवटे, गुड्डू शेठ अग्रवाल, भागवत सावकारे, भरत उमरीया यांचा सह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button