मलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयविदर्भ

रावेर लोकसभा प्रवास : प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर, जामनेर व मलकापूर विधानसभा बैठक संपन्न…

रावेर लोकसभा प्रवास दरम्यान प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांचा महाविजय 2024 या संकल्प पूर्तीसाठी मुक्ताईनगर, जामनेर व मलकापूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष चे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच मंत्री श्री.गिरीषजी महाजन, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर शहर येथे आयोजन करण्यात आले.

यावेळी 2024 मध्ये श्री.नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होण्यसाठी रावेर लोकसभा क्षेत्रात सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध योजना व विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवत पक्षाला व सरकारला जनतेकडून समर्थन मिळण्यासाठी आवाहन यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री श्री.गिरीषजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी, भाजपा मुख्यालय प्रभारी श्री.रविजी अनासपुरे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, डॉ.राजेंद्र फडके, श्री.विजराज शिंदे, जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री.गणेश मांटे, खामगांव जिल्हाध्यक्ष श्री.सचिनबापू देशमुख, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, श्री.अजय भोळे, मुक्ताईनगर विधानसभा निडणुक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, प्रदेश सचिव तथा रावेर लोकसभा समन्वयक श्रीमती शालिनी बुंदे, माजी जि.प.अध्यक्ष सौ.उमाताई तायडे, जामनेर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.चंद्रकांत बाविस्कर, मलकापुर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.शैलेश मिरगे, श्री.सचिन पानपाटील ई. प्रमुख उपस्थितीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button