खानदेश

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरातकार्तिक पौर्णिमा उत्सव आजपासून

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव दि २० – येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवास आज रविवार दि २६ पासून प्रारंभ होत आहे.श्रीकृष्ण मुर्ती अयर व अनिल रोकडे मंदिराचे पुजारी अभिषेक करणार आहे.
आजपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजेपासून ३१ उपचाराव्दारे अभिषेक सूरू होणार आहे. शहरातील विविध मान्यवरांच्या या कालावधीत पूजा संपन्न होणार आहे. तामीलनाडू येथे मुर्तीसाठी प्रसिध्द महाबलीपुरमहून तसेच केरळ कोटयायम तंथनम प्रतिकृती असलेल्या कार्तिकस्वामी, तामीळनाडू मथुराई मिनाक्षी केरळ येथील गुरूवायुर येथील भगवान श्री विष्णूची मुर्ती या ठीकाणी विराजमान आहे. जानेवारी २००० ला संपुर्ण दक्षिणात्य पध्दतीने प्राणप्रतिष्ठा तामिळनाडू येथील गुरूजींच्या हस्ते करण्यात आली.तिन प्रकारचे अभिषेक धन,सोने, चांदी यात भाविकांकडून चिल्‍लर पैसे गोळा करून अभिषेक व परत वाटप, सोने व चांदी अभिषेकसाठी चेन्नई वरून १०८ नाणे मागवून केला जातो. या काळात दर्शन अतिशय शुभ मानले जात असून केलेला नवस फेडण्यासाठी हजारो भक्‍त येथे दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान म्हणून कार्तिक स्वामी मंदिर प्रसिध्द आहे. आजपासून कार्तिक पोर्णिमा सूरू होत असल्याने मंदिर भक्‍तासाठी संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २३ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून कार्तिक नक्षत्र ११ वा.१० मि. सकाळी सुरू होत असून दु. ३ वा ५३ मि. कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु. २ वा १५ मि. समाप्ती होणार आहे. मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्रीमती अयर यांचेशी ९४०५१४३२३५ या क्रमांकवर संपर्क साधावा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button