शासनाने पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी – शेगांव शहर व ग्रामीण भागातील पोलीस भरती विद्यार्थीचे निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगांव
महाराष्ट्र पोलीस
दलात सेवा देण्यासाठी शेगाव शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी लॉकडाऊन च्या काळापासून पोलीस भरती ग्राउंड व पूर्व परीक्षेची तयारी करत गेल्या अनेक वर्षापासून चातकाप्रमाणे पोलीस भरती केव्हा निघेल याची वाट बघत आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून पोलीस भरती न निघाल्यामुळे येथील पोलीस भरती प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी माननीय आमदार संजय भाऊ कुटे यांना त्यांच्या पीए मार्फत निवेदन देण्यात आले शेगाव शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पोलीस भरती घेण्यात यावी याकरिता
आमदार संजयजी कुठे यांना निवेदन देण्यात आली. या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे स्वप्न बाळगले पोलीस भरतीची तयारी करित आहे. एवढ्या पोलीस भरती निघाली नाही. अनेक पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची वय मर्यादा संपत आली असून त्यामुळे आज शेगाव शहर व ग्रामीण भागातील पोलीस भरती विद्यार्थ्यांनी आमदार संजय जी कुठे यांना निवेदन देण्यात आली त्यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडावा असे या निवेदनातनमूद केलेले आहे



