गुन्हेगारीजळगावा जिल्हा

पाच लाखांची लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात ; जळगाव जिल्ह्यात खळबळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार

। १५ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचखोरीचा प्रकार उघडकीस येत आहे. यात आता आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. पाच लाखांची लाच घेताना सहायक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला आज एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४, सहायक गटविकास अधिकारी) व पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३, विस्तार अधिकारी) असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button