सामाजिक

लंडनच्या जॉनची इन्स्टाग्रामवर मैत्री अन् भेटायला आला घरी; 2 दिवस मुक्काम

प्रतनिधी रणधीर पवार

एकेकाळी सर्वसामान्य माणसाकडे साधी फोन सुविधा नव्हती, पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर चालत असे. मित्र म्हटला की प्रत्यक्ष भेट झाली तरच व्हायचा, मात्र आता धावत्या जगात फेसबुक, इन्स्टाग्राम व्हॉट्सॲप अशा अनेकविध सुविधा सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कुठेही संवाद साधला जातो, तसेच मैत्रीचे प्रमाणही अत्याधुनिक सुविधांनी सोयीस्कर झाले आहे.
या सुविधांमुळे मैत्री व विचार जुळण्याचे साधन आधुनिक असल्याने थेट सातासमुद्रापार मैत्री जुळत असते अशीच प्रचीती निमगूळ (ता. शिंदखेडा) येथे आली.येथील रहिवासी मिस्तरी हा सर्पमित्र आहे. त्याची ओळख लंडनस्थित जॉन याच्याशी इन्स्टाग्रामवर झाली. त्यालाही सापांची आवड आहे. तो भारतभ्रमणासाठी तीन वर्षांपूर्वी आला आणि थेट निमगूळला पोचला. त्यालाही सापांची आवड असल्याने तो भारतात भ्रमण करत असताना मित्रांना भेटायला येत असतो. त्याला खेड्यांची संस्कृती आवडत असल्याचे सांगतो. त्याने बैलगाडी, गुरे शेतीचे फोटो घेतले. येथील व्यंकटेश मिस्तरी त्याचे मित्र असून, दर तीन वर्षांनी भेटायला येतो. त्याला ग्रामीण भागाची संस्कृती, राहणीमान, जेवण या सर्वांची जॉनला खूप आवड आहे


तो निमगूळला दोन दिवस व्यंकटेश मिस्तरी यांच्याकडे मुक्कामाला होता. रामी येथील सर्पमित्र राहुल गिरासे यांच्याकडेही तो दोन दिवस मुक्कामाला राहिला आणि पुढे तो मार्गस्थ झाला. दर तीन वर्षांनी जॉन ब्रोली हा भारतात येत असतो व तो मित्राला भेटल्याशिवाय जात नाही.त्याला मराठी भाषा समजत नाही व ग्रामीण भागात त्याच्याशी फारसा संवाद साधता येत नाही. तरीही त्याला जे समजेल ते घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. निमगूळच्या व्यंकटेशला इंग्रजी येत नाही, मात्र बाकी इशाऱ्यावर काम करत त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button