शेगाव तालुक्यामध्ये मा. खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवत उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे तथा तालुका प्रमुख रामा पाटील था यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश .

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
आज शेंगाव मतदारसंघातील मौजे पहुरजिरा,माटरगांव,बेलुरा व मचिंद्रखेड येथे स्थानिक खासदार निधी अंतर्गत व अन्य विविध योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकास कांमाचे भूमिपूजन तसेच शिवसेना युवासेना शाखेचे उदघाटन शिवसेना नेते खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
मौजे पहुरजिरा,बेलुरा व मचिंद्रखेड इत्यादी गावामधील सरपंच, ग्रा . सदस्य तथा शेकडो युवक व नागरिकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. गावातील महिला बचत गटाच्या भगिनी व युवक ग्रामस्थ मंडळी यांच्या शी संवाद साधला त्यांच्या समस्या अडचणी समजून घेवून निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.राजु पाटील मिरगे,शिवसेना ता.प्रमुख मा.रामा पाटील थारकर,
जेष्ठ नेते मा.गोविंदराव मिरगे पाटील मा.संतोष लिप्ते,मा.आशिष मिरगे,मा. बेलुरा संरपच मा.अनंता पाटील,पहुरजिरा संरपच मा.मंगेश पारस्कर,मचिंद्रखेड संरपच मा.प्रविण भांरबे , सुयोग जुमले, प्रदीप खेडकर, अनिल जुमळे व शिवसेना युवासेना आजी-माजी प्रमुख पदाधिकारी विभाग प्रमुख,शाखाप्रमुख,संरपच ग्रा.प.सदस्य व गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.








