मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजतोय. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत.या आंदोलनाला राज्यभरात समर्थन मिळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ,चिखली ,सिनखेडराजा येथे मराठा समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत. काल खामगावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला काळे हसण्यात आले. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी, ताडशिवनी गावात पुढार्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. चिखलीत देखील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.



