कार्यालय बुलढाणा येथे दिव्यांग आत्योंदय राशनकार्डचे तसेच संजय गांधी निराधार योजने विषयी चर्चा

दिनांक ३१/१०/२०२३ रोज सोमवार ला तहसील कार्यालय बुलढाणा येथे दिव्यांग आत्योंदय राशनकार्डचे तसेच संजय गांधी निराधार योजने विषयी चर्चा करण्यात आली .मा. तहसीलदार श्री.खंडारे साहेब बुलढाणा यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी सांगीतले की, गरजु दिव्यांगाना आत्योंदय राशनकार्ड देवुन, तसेच ज्या दिव्यांग बांधवाचे काही कारणामुळे संजय गांधी निराधारचे पगार बंद झालेले आहेत ,आशा दिव्यांगाना त्यांचे पगार, तसेच जे दिव्यांग ६५ वर्षा वरती आसतील आशा दिव्यांगाना त्यांना श्रावण बाळ योजनेत समाविष्ट करुन त्यांचेही पगार चालू करुन देण्यात येतील.
मां. तहसीलदार साहेब बुलढाणा यांच्याशी दिव्यांगाच्या आनेक विषयवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच मा. तहसीलदार साहेबांनी सांगीतले की,येत्या १०तारखेला तहसील कार्यालय बुलढाणा येथे दिव्यांग आत्योंदय राशनकार्ड वाटप करण्यासाठी कार्यक्रम घेवून राशनकार्डचे वाटप करण्यात येइल. चर्चा करण्यासाठी पुरवठा विभागाचे मां. पवार साहेब,मा.जाधव साहेब,संजय गांधी निराधारचे मां.चिंचोले साहेब तसेच निराधार योजनेच्या मॅडम व इतर आधिकारी हजर होते. चर्चा करण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधि मिनाताई नामदेवराव डोंगरदिवे, उषाताई ईगळे, भाग्यश्री रविन्द्र कदम, मंगला मेढे, शिराज खान,सै.सोयब,आजम कुरेशी, कलीम भाई, मनोज नगरनाईक,सुनिता जाधव, राजेश ठोंबरे इत्यादि दिव्यांग बांधव हजर होते.



