बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

तेल्हारा शहरामध्ये, “गरजवंताना आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता सकल मराठा समाज तर्फे बेमुदत साखळी उपोषणला सुरुवात”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी-विजय घोडे

तेल्हारा दि ०२; तेल्हारा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ टॉवर चौक तेल्हारा येथे गरजवंतांना आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली असून
मराठा भूषण श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता प्राणांतिक उपोषण करित आहेत. अकोला येथील मराठा समाज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सक्रीय पाठींबा देत आहे.

यापूर्वी तेल्हारा तहसील चे तहसीलदार साहेब यांना निवेदन सुद्धा दिले होते या निवेदनामध्ये तहसील मराठा भूषण श्री जरांगे पाटील यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती राज्य सरकार ची जबाबदारी आहे. श्री जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास अथवा त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मराठा समाजात तिव्र असंतोष निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री जरांगे पाटील यांची नियमीत आरोग्य तपासणी व आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे व त्यांना झेड प्लस सुरक्षा तातडीने देण्यात यावी यासाठी आपण महाराष्ट्र शासनाला तातडीने कळवावे ,

त्याचप्रमाणे तहसिलदार म्हणून आपणास स्पष्ट कल्पना देण्यात येत आहे की, गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा यापुढे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांना जिल्हाबंदी, तर आमदारांना

गावबंदी करण्याचे आंदोलन करणार आहे. मराठा समाजाच्या भावना यासंदर्भात अतिशय तिव्र असून, मंत्र्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यास अथवा कार्यक्रम घेतल्यास त्यांचा कार्यक्रम व सभा उधळून लावण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात शासकीय अथवा अशासकीय कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना/पालक मंत्र्यांना निमंत्रीत करू नये आणि ते येणार असतील तर त्यांना तेल्हारा तालुक्यात न येण्याचे सूचित करावे अन्यथा होणाऱ्या परिणामास अकोला प्रशासन जबाबदार राहील. अशा स्वरूपाचा तपशील दिलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button