बुलढाणा

महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेचा २०२३ चा राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार सोहळा डॉ.गो.खे. महाविद्यालय (गाडेगाव) तेल्हारा जि.अकोला येथे संपन्न.

महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेचा २०२३ चा राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार सोहळा डॉ.गो.खे. महाविद्यालय (गाडेगाव) तेल्हारा जि.अकोला येथे संपन्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे.

तेल्हारा दि.२९; महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना तथा नटराज आर्ट अकॅडमी,वरखेड व लिटिल स्टार कॉन्व्हेंट,तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “”राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्कार 2023 सोहळा स्थळ- डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय,तेल्हारा येथे रविवार दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी मा.एड. किरणराव सरनाईक (अमरावती विभाग,शिक्षक आमदार) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गोपालराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री गोपालजी ढोले सर उपस्थित होते.
नटराज आर्ट अकॅडमी वरखेड तथा महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक ,पदवीधर संघटना व नटराज आर्ट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष उमेश दयाराम म्हसाये,राज्याध्यक्षा पद्मावती टिकार मॅडम, अमरावती विभागीय अध्यक्ष- श्री अतुल अमानकर, नागपूर विभागीय अध्यक्षा -सौ. मंजुषाताई चकोले, अमरावती विभागीय अध्यक्ष-(उर्दू विभाग) मो.वसीमोद्दीन सर,मराठवाडा विभागीय अध्यक्ष- प्रा.संजय तुपे सर, मुंबई विभागीय अध्यक्ष- बाळू नेहेसर, तसेच कदीर शाह अकोट, श्री. गजानन दांदळे सर अकोट, हिम्मतराव दंदी साहेब (पो. हे.कॉ.) श्री मनीष आढाव सर अकोट, श्री मुरलीधर पोहरे (संचालक वसुंधरा शिक्षण संस्था वारखेड) अतिथी म्हणून उपस्थिती होते.या प्रसंगी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून एक याप्रमाणे शिक्षक, समाजसेवक, कलावंत,पत्रकार, खेळ- क्रीडा, कृषी, महसूल, पोलीस अशा वेगवेगळ्या विभागातून आलेल्या समाजसेवकांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी “संघटनेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.” या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. तसेच यावेळी जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध प्रकारचे बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निखाळे सर,पाठक सर, सौ.खेळकर मॅडम,सौ. घाटोळ मॅडम, यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये यांनी मानले .
राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार २०२३ च्या वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राज्याध्यक्षा पद्मावती टिकार मॅडम, तसेच सतिश सावरकर, वैष्णवी सुशीर, प्रणिता सदाफळे, विजय घोडे, मनोज आनेरकर, सोपानराव यादगिरे, दिनेश डाबरे, राम फोकमारे, प्रज्वल कोरडे,श्री. सागर मते, अतुल ताडे,मो. इसाक सर, मोहसीन खान, अजय पाटील, छायाताई पोहरे, संगीता गावंडे, योगेश ठाकरे, तथा नटराज अकॅडमी चे सर्व सदस्य तथा लिटल स्टार कॉन्व्हेंट तेल्हाराचे सौ गुहाड मॅडम, खेडकर मॅडम, यांचे सह आदींचे सहकार्य लाभले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button