धर्मवीर आमदार श्री.संजूभाऊ गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात होणार संपन्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण
बुलढाणा -: बुलढाणा चे आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड हे जनतेच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे…
विकास, जनसेवा आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज…
बुलढाण्याचे कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचा
दि. २९ मे २०२६ रोजी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे ,
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना रोजगार, रस्ते विकास, धार्मिक व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने जनतेसाठी लढणारे नेतृत्व म्हणजे संजुभाऊ..!
सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करणारे, संकटात मदतीला धावून जाणारे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे लोकनेते म्हणून त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून —
:- भव्य रक्तदान शिबिर
:- विविध सामाजिक कार्यक्रम
:- जनतेच्या सेवेसाठी समर्पित उपक्रम
“वाढदिवस नाही… जनसेवेचा संकल्प दिवस!” अश्या प्रकारचे उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करणार असून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे .



