महाराष्ट्रसामाजिक

तेल्हारा तालुक्या मधील हिवरखेड येथील धिरज बजाज यांना पसायदान पुरस्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-व्ही एम घोडे

हिवरखेड/ता.तेल्हारा दि २१:- तेल्हारा तालुक्या मधील
हिवरखेड या गावचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते धिरज संतोष बजाज हे फक्त समाजिक कार्यकर्ता नसुन एक पत्रकार सुद्धा आहेत,यांना नुकताच पसायदान पुरस्कार अकोला येथील भव्य समारंभात देण्यात आला.
शंभूराजे प्रतिष्ठान अकोला तर्फे स्मृतीशेष रामकृष्ण मिटकरी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित आदरांजली सोहळ्यात
जागतिक कीर्तीचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज, लोकनेते माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ रमेश थोरात, प्रसिद्ध उद्योजक नाना उजवणे, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, शंभुराजे प्रतिष्ठानच्या सौ कविताताई मिटकरी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोट मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार धिरज बजाज यांची निवड या पुरस्कारासाठी झाली.
धिरज बजाज ह्यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक असून अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल आंदोलनापासून प्रभावित होऊन सामाजिक क्षेत्रात त्यांनी कार्य सुरु केले.
मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सामाजिक, व जनजागृतीपर कार्य ते करीत आहेत. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, हिवरखेड विकास मंच, लोकजागर मंच इत्यादी संस्थांच्या माध्यमातून आणि सर्व हिवरखेड वासीयांच्या सहकार्याने हिवरखेड नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी अविरत संघर्ष केला ती मागणी मा. आमदार अमोलदादा मिटकरी यांच्या विधिमंडळातील पाठपुराव्याच्या साथीने पूर्णत्वास आली आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख खडतर रस्त्यांचा विषय, अकोला हिवरखेड खंडवा इंदोर रेल्वे मार्ग, हिवरखेडला तालुक्याचा दर्जा मिळावा, विविध बस सेवा सुरू करणे, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यापारिक, महिला, दिव्यांग, भ्रष्टाचार प्रतिबंध, महागाई, बेरोजगारी, वीज, पाणी, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक, राजकीय, अशा सर्व समावेशक विषयावर आजपर्यंत हजारो बातम्या प्रकाशित करून निरंतर जनजागृतीचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.
वरील समारंभात विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. धिरज बजाज हे पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्दल त्यांचे वर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक तुलसीदास खिरोडकार यांनी तर संचालन श्रद्धा वरणकर यांनी केले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button