महाराष्ट्रसामाजिक

शेगाव नगर परिषदेला प्रदूषण नियंत्रण मंडळा कडून अहवाल सादर करण्याच्या सूचना.

गोपाल तायडे यांच्या तक्रारी वरून प्रदूषण विभागाची कारवाई .

‌स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

डॉ.अण्णा भाऊ साठे नगर ( म्हाडा कॉलनी ) येथील टॉयलेट चेंबर मल विसर्जन तसेच इतर घाण कचरा साफ सफाई संदर्भात स्थानिक नगर परिषद कोणत्याच प्रकारचे लक्ष देत नसून जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार दि.५/ १०/ २०२३ रोजी
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या द्वारे महाराष्ट्र उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय अकोला यांना देण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला मार्फत डॉ. अण्णा भाऊ साठे नगर येथील टॉयलेट चेंबर,घाण कचरा व्यवस्थापन बद्दलचा अहवाल महाराष्ट्र प्रदुषण नीयंत्रण मंडळ अकोला येथे सादर करण्याचे पत्र नगर परिषद शेगाव कार्यालयाला देण्यात आले असून त्याच बरोबर दिलेल्या तक्राराची प्रत प्रादेशिक अधीकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अमरावती कार्यालयाला माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. असे नगर परिषद शेगाव कार्यलयाला कळविण्यात आले आहे. कॉलनीतील टॉयलेट चेंबर मल विसर्जन व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात यावे. टॉयलेट चेंबर चॉकअप होऊ नये करिता मोठी पाईप लाईन टाकण्यात यावे.,कॉलनीत चवदा सदनिका मिळून एक मोठे सेफ्टी टॅंक देण्यात यावे. कॉलनीतील ईतर घाण काचारा चे ही योग्य रित्या व्यवस्थापन यावे असे तक्रार अर्जात नमूद कारण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button