
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सतत आर्थिक संकटात आहे. खर्च दुप्पट लागतो आणि उत्पादक अत्यल्प आहे. तसेच अजूनही समाधानकारक भाव सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळाला नाही. याबाबत सत्ताधाऱ्यांना काही घेणे देणे नाही. आता जसं कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्र्यांना अडविले आहे. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही; अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तर कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. चक्कर म्हणाले की, येत्या काळात राज्य कार्यकर्त्यांना शेतमालाच्या घसलेल्या भावांनो रोशाला सामोरं जावं लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांची वाट अडवली. येत्या काळात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात अर्थात विदर्भात बाजारभाव कमी असल्यानं शेतकरी आक्रमक होऊ शकतात.
भाजपाचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या विदर्भात भाजप नेत्यांना याचा फटका बसू शकतो. याचा प्रत्यय काल नाशिक जिल्ह्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कांदा, टोमॅटो भाजीपाल्याच्या पिकांची शेतकरी सतत संकटात आहेत. तर गेल्या २ वर्षापासून कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यानं यंदाही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे तुकर म्हणाले.



