गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हा! अँड वृषालीताईबोंद्रे यांचे आवाहन! हिरकणी महिला प्रतिष्ठानचे आयोजन…

गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हा! अँड वृषालीताई
बोंद्रे यांचे आवाहन! हिरकणी महिला प्रतिष्ठानचे आयोजन…
स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
चिखली परिसरासह जिल्ह्यातील महिलांच्या कल्पकतेला आणि सृजनशील ते सह सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उदांत हेतूने हिरकणी महिला उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.२१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार
असून स्पर्धेत शहरी व ग्रामीण महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिरकणी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अँड वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे.
हिरकणी महिला उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचा सर्व स्तरातून विकास व्हावा, या उद्देशाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि आरोग्य विषयक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गौरी (महालक्ष्मी) सजावट स्पर्धेच्या माध्यमातून सन २०२१ पासून स्त्रियांचा उत्साह वाढविण्याचा उपक्रम हाती
घेण्यात आला आहे. या स्पर्धेचे आकर्षक सजावट, केली मखर डेकोरेशन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरीची आकर्षक वेशभूषा, अलंकार परिधान, अशा विविध छटा दर्शविणारा गौरी या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे.२१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. प्रथम विजेत्यास आकर्षक पैठणी, इतर विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



