बुलढाणा अर्बन दिव्य विवेकानंद’मध्ये गणरायाची स्थापना; बाल विद्यार्थांची मिरवणूक ठरली लक्षवेधी

‘बुलढाणा अर्बन दिव्य विवेकानंद’मध्ये गणरायाची स्थापना; बाल विद्यार्थांची मिरवणूक ठरली लक्षवेधी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी उषा इंगळे बुलढाणा
स्थानीय बुलढाणा अर्बन दिव्य विवेकानंद क्लासेस येथे गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी परिसरातून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अभ्यासाचा ताण तणाव विसरून विद्यार्थ्यीनी विद्यार्थी भक्ती गीतांच्या तालावर थिरकले. या वेळीबालगोपालांचा उत्साह वाखाण्याजोगा होता, जल्लोष निघालेली ही छोटे खानी मिरवणूक’ विवेकानंद’मध्ये दाखल झाल्यावर पालकांच्या हस्ते गणेशाची विविवत स्थापना करण्यात आली.प्रा संदीप पाटील,प्रा राहुल पाटील, अश्विनी शिरसाट-पाटील व कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतली. दरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, उत्साहाची ओळख व्हावी. त्यांच्यातील अंगभूत कला कौशल्या ला संधी मिळावे, यासाठी बुद्धीच्या देवतेची स्थापनाकरण्यात आल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.



