जळगावा जिल्हामहाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्या – डॉ.केतकीताई पाटीलदर दिवसाला ३ आरोग्य शिबिर,

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार

गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्या – डॉ.केतकीताई पाटीलदर दिवसाला ३ आरोग्य शिबिर, प्रतिदिवशी ५०० हून अधिक नागरिकांची तपासणीजळगाव – हे गणपती बाप्पा… तुझ्या आशिर्वाद सर्वांच्या नेहमी पाठीशी राहू दे.. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना शुभदायी, लाभदायी, निरोगी आरोग्याचा जावो, या सदिच्छांसह नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेऊन निरोगी आरोग्याकडे पाऊल टाकावे, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे. गोदावरी फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील लहान-मोठ्या गावांमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वांसाठीच विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे. ह्या शिबिरांमध्ये सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपस्थीत राहणार असून ईसीजी कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी देखील मोफत केली जाणार आहे. लाडक्या गणपती बाप्पांचा आशिर्वाद सर्वांना मिळावा या सदिच्छेसह आरोग्य तपासणी शिबिरांची भेट डॉ.केतकीताईंनी उपलब्ध करुन दिली आहे. अधिक माहितीसाठी दिपक पाटील यांच्याशी ९४२२८३७७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.सर्व आजारांची प्राथमिक तपासणी व उपचारआरोग्य तपासणी शिबिरात कान नाक घसा विकार, नेत्रविकार, स्त्रीयांचे विकार, हाडांचे मणक्यांचे विकार, त्वचाविकार, हृदयविकार, दारुमुळे निर्माण झालेले पोटाचे विकार यासह प्लीहा, विविध प्रकारच्या गाठी, थायरॉईड, पाईल्स, भगंदर, फिशर, डायबेटिक फूट, हर्निया, अल्सर, आतडंयांमधील अडथळे, अपेंडीक्स, हायड्रोसिल अशा विविध आजारांची प्राथमिक तपासणी शिबिरात केली जाणार आहे. ङ्क्षशिबिरातून रेफर झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहे.— अशी आहे शिबिरे —-बुधवार, दि.२० सप्टेंबर – धनाजी नाना सार्वजनिक वाचनालय, खिरोदा प्र.यावल, वेळ सकाळी ११ ते २गुरुवार, २१ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, वेले आखतवाडे ता.चोपडा, वेळ – सकाळी ११ ते २गुरुवार, २१ सप्टेंबर – देशमुख वाडा, अडावद ता.चोपडा, वेळ – सकाळी ११ ते २शुक्रवार, दि.२२ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, तरवाडे खुर्द ता पारोळा, वेळ – सकाळी ११ ते २शनिवार, दि.२३ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, लोणवाडी ता.मलकापूर, वेळ सकाळी ११ ते २शनिवार, दि.२३ सप्टेंबर – सरदार वल्लभभाई पटेल चौक, सर्वोदय गणेश मंडळाजवळ, कुंभारस्टेक, एरंडोल, वेळ – सकाळी १० ते २शनिवार, दि.२३ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, लोणजे ता.चाळीसगाव – वेळ सकाळी ११ ते २

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button