रिधोरा क्रॉसिंग परिसराला गोपीनाथजी मुंडे नांव द्या !

वंजारी समाजाची मागणी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : -ब्राम्हणवाडा,
रिधोरा,सुकांडा व परिसरातील वंजारी समाज बांधवांनी अकोला,वाशिम राष्ट्रीय महामार्ग 161 रिधोरा क्रासिंग गावाजवळ समृध्दी महामार्गाच्या परिसराला स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब” श्रध्दा परिसर असे नाव देण्यात यावे अशी मागणी वंजारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल रंगराव घुगे व महेश शिवाजी केकन यांनी दिं ८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,वाशीम यांना लेखी निवेदन देऊन केली आहे स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब,जेव्हा,जेव्हा अकोला किंवा या रस्त्याने जात तेव्हा,तेव्हा ते रिधोरा येथे काही काळासाठी विश्रांती घेत व समाज बांधवांशी चर्चा करत तसेच या परिसरातील पंचक्रोशीत त्यांचे शेकडो समाज बांधव व नातेवाईक राहतात त्यांच्यामुळे हा परिसर प्रसिद्ध आहे तेव्हा समाज बांधवांच्या मुंडे साहेबांप्रती असलेल्या आदरयुक्त भावनां जाणून या परिसरातला त्यांचें नांव देण्यात यावे असेही अनिल घुगे व महेश केकन यांनी यावेळी सकाळशी बोलताना सांगितले आहे.



