जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा पोलीस बॉईज संघटने तर्फे 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यास श्रद्धांजली ,व भारतीय संविधान दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी दि.२६
टावर चौक तेल्हारा येथील , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ दि २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यास तेल्हारा पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने मेणबत्त्या लावून , पुष्प अर्पण करत दोन मिनिटाची मौनता बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच आजच्याच दिनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समता ,न्याय ,बंधुता न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती केली, २६ नोव्हेंबर रोजी घटना समितीनं ओजस्वी आणि तेजस्वी लेखणीतून तयार झालेल्या या भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला , त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस सर्वत्र संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो या दिनानिमित्ताने पोलीस बॉईज संघटनेने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
१५ वर्षापुर्वी दि. २६/११/२००८ रोजी महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण मुंबई ,या शहरावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता , या हल्ल्याने संपूर्ण मुंबई हादरून गेली होती मुंबईच्या ज्या जनतेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता त्या जनतेला वाचविण्यासाठी पोलिसांनी व तेथील काही सैनिकांनी आपले बलिदान देऊन जनतेचे संरक्षण केले आणि मुंबई सुरक्षित केली हे बलिदान जनता कधिच विसरणार नाहि.आजच्या दिनी या हुतात्म्यांना सर्वत्र श्रद्धांजली वाहण्यात येते.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने करण्यात आले असुन कार्यक्रमाची सुरुवात तेल्हारा पोलीस स्टेशनचे पि.एस.आय. गणेश कायंदे साहेब यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन मेणबत्ती लावुन करण्यात आली यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्वप्निल सरोदे साहेब ,हरी शुक्ला साहेब ,सागर गिरी साहेब,संतोष गिरे साहेब,सतीश भटकर साहेब,ईश्वर भारसाकडे साहेब ,विश्वनाथ डांगे साहेब,राजेश इंगळे साहेब तसेच आजी-माजी सैनिक संघटनेचे पांडुरंग खुमकर साहेब, राम पाऊलझगडे साहेब, जवकार साहेब,सय्यद चांद साहेब ,होमगार्ड , माजी नगरसेवक सुनील राठोड ,सचिन भाऊ तायडे ,बजरंग दल चे निलेश भाऊ खेट्टे , शिवसेनेचे प्रवीणदादा वैष्णव, सतीश बिहाडे ,मंथन वैष्णव ,अभिषेक डोंगरे ,आयुष डोंगरे ,दिलीप हिवराळे, गजानन कान्हेरकर उमेश पुदाके , थाटे भाऊ निलेश पुदाखे समाजिक कार्यकर्ता ,गणेश काका गुहाड,अविनाश सोनोने,संदिपभाऊ खारोडे, तसेच पत्रकार बंधु विजय म. घोडे,अमिर शेख ,सिसोदिया यांचेसह तेल्हाऱ्यातील बहुसंख्य नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेल्हारा पोलीस बॉईज संघटनेचे शहर अध्यक्ष दिनकर डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेल्हारा पोलीस बॉईज संघटनेचे तालुका अध्यक्ष गोलू दादा वैष्णव यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button