नैसर्गिक
पावसामुळे घर पडली शिव आपल्यासह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव : स्थानिक नगरपालिका शेगाव अंतर्गत येणाऱ्या नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.
भीम नगर परिसरामधील गिताबाई सुभाष शेगोकार दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे घर जमीन दोस्त झाले त्यामुळे या कुटुंबातील चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करुन देण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे



