चिखली तालुक्यात दमदार पावसाची सुरुवात; पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी चिखली:- सलमान पठाण
चिखली तालुक्यात दमदार पावसाची सुरुवात; पुढील पंधरा दिवसांत पेरणीला वेग येण्याची शक्यता,बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या होत्या. पाण्याअभावी शेतकरी चिंतेत होते, तर जनावरांसाठी चारा व पाण्याचीही समस्या निर्माण झाली होती.
मात्र, वरुणराजाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून येत्या पंधरा दिवसांत पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याने शेतकरी आशावादी झाले आहेत. गावागावात आनंदाचे वातावरण असून शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत.



