दहीहंडी उत्सवात दुःखद घटना! गॅलरी कोसळून चिमुकली ठार एक गंभीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
जिल्ह्यात काल दहीहंडी उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा झाला.. मात्र देऊळगाव राजा शहरात घडलेल्या एका घटनेने समजमन हळहळले आहे. दहीहंडी उत्साहात बांधलेल्या दोरीने गॅलरी कोसळल्याने दहीहंडी पहा तुम्ही असलेली चिमुकली जागीच ठार झाली. चिमुकलीचे वय केवळ ९ वर्षाचे आहे. प्राप्त माहितीनुसार काल, संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा शहरातील मासिंगपुरा भागात ही घटना घडली. दहीहंडीसाठी एका बंद अवस्थेत असलेल्या घराच्या गॅलरी ला दोरी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा या दोरीला लटकला तेव्हा ताण पडल्याने सिमेंट पिल्लर सह गॅलरी कोसळली. खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निशा रशीद खान पठाण (९) या चिमुकलीच्या अंगावर दहीहंडी कोसळल्याने ती जागीच ठार झाली. याच दुर्घटनेत अल्फिया शेख हाजीफ ही ८ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मूर्ख व जखमींना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.



