महाराष्ट्र

*बोरशेती गावात जिजाऊ-सावित्री संयुक्त जयंती व स्वा.सैनिक किसनबाबा यांच्या स्मृतिदिनाचा दैदिप्यमान सोहळा मोठया उत्साहात संपन्न.

शहापूर -(सचिन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या शहापूर तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेले सलग ८ वर्षे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.यावर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाखा उपाध्यक्ष शिवश्री केशव करण सर यांचे अध्यक्षतेखाली बोरशेती गावात केले गेले होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू शिवश्री.आनंदराव मोरे,पणतू उद्धव मोरे व कुटुंब,काॅम्रेड शंकर भोईर,किसन बाबा भेरे यांचे नातू मा.रमेश भेरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा सचिव शिवश्री. दादाजी यशवंतराव,डाॅ.रामचंद्रजी देसले,जेष्ठ नागरिक रामचंद्र ठाकरे,सुनिता बांगर,शिवसेना शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाशजी वेखंडे, कृ. उ. बा. समिती संचालक वामनशेठ गायकर,सरपंच रविंद्र हिलम,बाळू भागरे, एकनाथ देसले सर तसेच बोरशेती-कळंभे गावातील महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, युवा व बालवर्ग,निमंत्रित अतिथी,दिनदर्शिकेचे साहाय्यकर्ते,तसेच शहापूर शाखेचे केंद्रीय पदाधिकारी,महिला कमिटी,विभागीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य असे जवळपास ४०० हून अधिक समाजबांधव उपस्थित होते. प्रमुख वक्ते शिवश्री.सुनिलजी देवरे सर‌ आणि शिवमती.भक्ति विशे (फर्डे )यांनी जिजाऊ-सावित्री- स्वा. सै.किसनबाबा भेरे -क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक,सांस्कृतिक,वैचारिक कार्याचा दैदिप्यमान इतिहास उपस्थित जनसमुदायास अवगत केला.शाखेच्या वतीने १०० हून अधिक जेष्ठ ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला तसेच शाखेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवर जाहिरातदारांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी नियोजन शाखेचे सहखजिनदार शिवश्री.विलास विशे, कार्यकारिणी सदस्य अशोक बांगर,विभाग सचिव चंद्रकांत निचिते, उपाध्यक्ष लक्ष्मण भागरे,अनंता निपूर्ते, प्रशांत वाळिंबे,गणेश धलपे,लक्ष्मण किरपण,पंकज वाळिंबे या शहापूर विभागाच्या सदस्यांनी केले.बोरशेती खुर्द व बोरशेती बुद्रुक गावांतील अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी सढळ हस्ते सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार नामदेव तिवरे व सूत्रसंचालन सहसचिव प्रसाद फर्डे यांनी केले तर छायाचित्रण सचिव उमेश पाटील यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button