आ राजेश एकडे यांच्या हस्ते प्रभाग क्रं १ मध्ये ५५लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व कार्यारंभ

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
नांदुराः शहरातील प्रभाग क्रं १मध्ये आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते ५५लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व कार्यारंभ ७सप्टेंबर ला सकाळी १०वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले
भूमिपूजन प्रसंगी बोलतांना आ एकडे म्हणाले की नांदुरा शहर स्वच्छ व सुंदर करून शहराचा सर्वांगीण विकास घडविण्याचा माझा मानस असून याकरिता लागणारा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपस्थितीतांना दिली
या विकास कामांमध्ये जळगाव जामोद रोड ते रामनगर आणी शिवशंकर नगरमध्ये खडीकरण ,जळगाव जामोद रोड ते सुनील फुटवाईक यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व नालीचे बांधकाम करणे, जळगाव जामोद रोड ते ईस्माईल भाई यांच्या घरापर्यंतही नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे, मुख्य रस्त्यापासून ते सहमद भाई यांच्या घरापर्यंत डांबरीकरण तसेच शाहिन कॉलनीतील अल्ताफ भाई ते मुशर्रफ सर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे आदींचा समावेश आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून न प मुख्याधिकारी तथा प्रशासक मिलिंद दारोकार हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी न प उपाध्यक्ष लालाभाऊ इंगळे,न प सदस्य सर्वश्री प्रमोद गायकवाड, अजय भिडे,किशोर खैरे यांच्यासह प्रभाग क्रं १मधील असंख्य नागरीकांची उपस्थिती होती



