उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मराठा समाजाचे खरे हितचिंतक! आमदार श्वेता ताई महालेंनी सांगितलस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधी

उषा इंगळे बुलढाणा
देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केल नेतेपत्रकातून आकडेवारी मांडली…
भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे हितचिंतक असून त्यांनी मराठा व कुणबी समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत, मात्र अशी असतानाही विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून काही लोक फडणवीस यांना दोषी धरत बसत आहेत मात्र, वस्तुस्थिती वेगळे असून मराठा व कुणबी समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामगिरी अतिशय मोलाची असल्याचे प्रतिपादन आ. श्वेता ताई महाले यांनी केले. यासंदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या
निर्णयाची माहिती आकडेवारी सह एका पत्रकातून प्रसिद्ध केली.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे खरे हितचिंतक व सच्चे मित्र असल्याची काही उदाहरणे मला येथे प्रकर्षाने द्यावीशी वाटतात. विदर्भातील वैनगंगा- पैनगंगा नदी जोड प्रकल्पामुळे सर्वाधिक फायदा विदर्भात राहणाऱ्या मराठा व कुणबी समाजाला होणार आहे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या या समाजाची उत्पन्न कैक पटीने वाढणार असून त्याचे लाभ त्यांच्या येणारा पिढ्यांना देखील निश्चित मिळतील. हा ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाचा सहभाग आहे हे येथे आवर्जून नमूद करावी लागेल”आमदार श्वेता ताई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
मराठवाड्याचा कायापालट करणाऱ्या प्रकल्प म्हणजे मराठवाडा वाटर ग्रीड तोदेखील देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता लवकरच मिळणार असून कोकणात वाहून जाणारे १०३ टी एम सी पाणी मराठवाड्यातील अकरा धरणांमध्ये आणून येथील शेतात बारमाही पाणी खेळण्याचा व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन आणण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे कोणीही विसरता कामा नये याची आठवण आमदार श्वेता ताई यांनी प्रसिद्धी पत्रकातून करून दिली आहे. याशिवाय मराठा तरुणांना सारखी या संस्थेमार्फत स्वयंपूर्ण आणि आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे श्रेय सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. बंद पडलेली सारथी संस्था पुन्हा सुरू करून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो मराठा तरुणांना आजवर नवी दिशा देण्याचे कार्य फडणवीस यांनी आमदार सौ .महाले यांनी पत्रकारात्मभूत केले आहे.🖊️



