शिक्षक दिवस उत्साहात साजरा

5 सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. व कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.चौधरी व डॉ.शैलेश तायडे आणि अध्यक्ष डॉ . पी.आर.सपकाळे आणि इतर शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी शिक्षकाचे महत्त्व समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयी भाषणे दिली.
शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये भाषण सुद्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मान करिता त्यांना पुष्पगुच्छ दिले आणि त्यांचे आभार मानले आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



