महाराष्ट्रराजकीय

४५ लोकसभा तर २०० पेक्षा जास्त जागा विधानसभेत महायुती जिंकणार !भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावाशहरात भाजपचं घर घर चालो अभियाना उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

खामगाव :
मोदीजींनी राज्याचा संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्यांपासून प्रत्येक वर्गासाठी केलेल्या विविध कामांमुळे राज्याचा संपूर्ण देशामध्ये पुन्हा सत्ता महायुती (एनडीएला) मिळणार आहे यात शंका नाही. महाराष्ट्र मध्ये ४५ लोकसभा तर २०० पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मिशन २०२४ अंतर्गत भाजपचं घर घर चालो अभियान सुरु असून शनिवारी खामगावातील कार्यक्रामात ते पत्रकारांशी बोलत होते.
आगामी निवडणुकांसाठी भाजपने ‘महाविजय २०२४’ संकल्पाची घोषणा केली आहे. भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेसाठी ‘मिशन ४५’, तर विधानसभेसाठी ‘मिशन २००’ जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात विशेष सभा, कार्यकर्ते शिबिरे, मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील घाटा खालील खामगावात संपर्क से समर्थन, घर घर चलो अभियान साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातून पदयात्रा काढली.
यावेळी त्यांनी प्रत्येक दुकांनामध्ये जाऊन नागरीकांशी संवाद साधला यावेळी त्यांचे शहरातील मुख्य बाजार पेठेत वेगवेगळया प्रतिष्ठाणांव्दारे व विविध समाजाव्दारे त्यांचे स्वागत करण्यात आले. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड.आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगावात मिशन महाविजय २०२४ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी निर्मल टर्निग पॉईंटवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून घरघर चलो अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमदार एडवोकेट आकाशदादा पुंडकर यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले कि, भाजपाचे महाविजय 2024 हा मिशन घरघर चलो अभियान चालू आहे या माध्यमाने प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचणार आहे. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून 45 लोकसभा तर 205 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा विधानसभेत युती जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. देशांमध्ये समान नागरी कायदा आला तर त्याचे ते सर्वांचे हिताचेच ठरणार आहे. असे म्हणत बुलढाणा लोकसभेमध्ये आम्ही साडेतीन लाख तर एका विधानसभा मतदारसंघांमध्ये ६० हजार घरापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. लोकसभेसाठी या जिल्ह्यामध्ये 600 कार्यकर्ते पूर्णवेळ काम करण्यासाठी निघालेले आहेत. आणि राज्यामध्ये ५१% पेक्षा जास्त मते घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 च्या वर जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे. याशिवाय मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरून माती जमा करून असते दिल्ली येथील कर्तव्य वाटिका मध्ये वापरल्या जाणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टी शासनाला मदत करीत आहे. जागा वाटपाबाबत बावनकुळे म्हणाले की महाविकास आघाडी मध्ये एकूण ११ पक्ष असून ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षांना जागा मिळेल त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी उमेदवार निवडून आणण्याचा काम आम्ही सर्वजण करणार आहोत असे ते म्हणालेत.

          या पदयात्रेत मा.उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, मा.श्री बाळासाहेब भेगडे माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष खामगांव सचीन देशमुख, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ मांटे,  मा.आ.चैनसुखजी संचेती,जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड.आकाश फुंडकर,  मा आ श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे,  श्रीमती शालीनीताई बुंधे, श्री विनोद वाघ, श्री सागर फुंडकर, श्री संजय शिनगारे खामगांव विधानसभा प्रमुख, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, श्री शरदचंद्र गायकी, सुरेश गव्हाळ तालुकाध्यक्ष, डॉ एकनाथ् पाटील, श्री राम मिश्रा युवा मोचा शहराध्यक्ष, श्री पवन गरड  विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, जितेंद्र पुरोहित, यांचे सह भाजपा, युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येत सहभागी झााले होते.

चौकट –
आमदार आकाशदादा फुंडकर यांचे उत्कृष्ट नियोजन !

भारतीय जनता पार्टीच्या मिशन 2024 ची बुलढाणा जिल्ह्यातील सुरुवात रजत नगरी खामगावातून होत असल्याने याची जाहीर तयारी मागील दोन दिवसांपासून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट आकाशदादा पुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत होते. आज शनिवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शहरात दाखल होणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी शहरातील निर्मल टर्निंग पॉईंट वर उपस्थिती दिली होती. शहरात भारतीय जनता पार्टी कडून रस्त्याच्या दोन्ही बाजूने भारतीय जनता पार्टीचे झेंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागत फलकाने शहर गजबजुन गेले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button