जळगावा जिल्हा
लोकशाही अधिकार सभा, तिर्थक्षेत्र राळेगणसिद्धी!

लोकशाही अधिकार सभा, तिर्थक्षेत्र राळेगणसिद्धी!
मा.आण्णा हजारे यांनी लोकांच्या नागरी हक्कासाठी आठ कायदे बनवले.त्यामुळे शासन प्रशासन बाबतीत लोक जागृत तर झालेच पण वचक सुद्धा ठेवू लागले.तरीही अनेकांना यातील अंमलबजावणी बाबत काही अडचणी येतात.त्याबाबत मा .आण्णा हजारे यांचेकडून नैतिक बळ मिळाले.
मा.आण्णा हजारे यांचे शेवटचे आंदोलन लोकपाल साठी झाले.कांग्रेस जाऊन भाजप सत्तेवर आली.तरीही भाजपने लोकपाल कायदा बनवण्यासाठी काहीच काम केले नाही.भ्रष्टाचार करायचा आहे.फक्त कांग्रेस नव्हे भाजप , शिवसेना राष्ट्रवादी चा सुद्धा हाच अजेंडा आहे.असा अलिखीत आणि कृतीशील अजेंडा आहे.याबाबत अनेक लोक आण्णांना दोष देतात.भ्रष्टाचार राजकीय पक्ष करतात तर मग,दोषी आण्णा कसे?म्हणे आण्णा आता का उपोषण करीत नाहीत? ते भाजपचे हस्तक आहेत का? या प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधली.तरीही काही लोकांना समक्ष भेटून प्रश्न मांडली.आणि आण्णांनी उत्तरे दिली.
शिवाय राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि पंचायतराज मधील भ्रष्टाचार अतोनात बोकाळलेला आहे.तो तर आम्ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खूप अडचण निर्माण करीत आहे.आजच्या चर्चेतून अनेक आरोप प्रत्यारोप दूर होतील.शंका कुशंका निरस्त होतील.
आण्णा आता खूप थकलेले आहेत.तरीही आम्ही त्यांचेकडून आंदोलनाची अपेक्षा ठेवतो.तर ती अपेक्षा कशी पुरी करता येईल, याबाबत अण्णांनी मार्गदर्शन केले .पुढे आपण अण्णांची जागा घेऊ.आपणच आंदोलन करू.अशी उर्मी जागृत झाली.हा देश फक्त अण्णांचा नाही.माझा सुद्धा आहे.म्हणून आण्णांचे कार्य आपण पुढे नेले पाहिजे.
पुणे येथून आलेले श्री प्रकाश गोडवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शिवराम पाटील यांचा राळेगणसिद्धी येथे सत्कार केला.
यासाठी आम्ही श्री अशोक सब्बन यांचेशी संपर्क करून एक सभा राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेतली.अनेक लोकांना अण्णांचे दर्शन घेण्याची उत्सुकता होती.ती पुरी झाली.
….


शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



