महाराष्ट्रसामाजिक

वृक्षाला राखी बांधून वृक्ष बंधुप्रेमाचा दिला संदेश, लिटल स्टार कॉन्व्हेंट तेल्हारा येथे रक्षाबंधन उत्सव साजरा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.प्रतिनिधी-व्हि एम घोडे

तेल्हारा दि.३०.बुधवार ला रक्षाबंधन निमित्त लिटल स्टार कॉंव्हेंट हिवरखेड रोड तेल्हारा येथे बहीण भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. येथील विद्यार्थ्यांनी “वृक्षाला राखी बांधून” या द्वारे जगाला एक चांगला संदेश दिला आहे व अतिशय वेगळ्या पद्धतीने हा ऊत्सव साजरा करण्यात आला.
“झाडे लावा घरोघरी, निसर्ग साथ देई मरणोत्तरी”
या म्हणी प्रमाणेच या वर्षीचा हा ऊत्सव अतीशय सुंदर आणि वेगळ्या पदतीने साजरा करण्यात आला,तसेच यावेळी शाळेतील मुलींनी सर्वांना राख्या बांधल्या व हा रक्षाबंधनाचा ऊत्सव साजरा केला.तसेच सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थी आणि पालकांनी टाकाऊ पासून टिकाऊ अशा सुंदरशा राख्या तयार करुन त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, हे प्रदर्शन पाहण्याकरिता नटराज आर्ट अकॅडमीचे सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. यावेळी नृत्य स्पर्धा ,गीतगायन स्पर्धा, व वक्तृत्व स्पर्धा, राबविण्यात आल्या. कार्यक्रमाकरिता कॉन्व्हेंटच्या मार्गदर्शिका पद्मावती टिकार मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच सौ. राणी खेळकर मॅडम व सौ प्रियांका गुहाड मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अथक परिश्रम घेतले. यावेळी प्रमुख उपस्थितीत कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button